अरुण पवार
२०१२ मध्ये एका छोट्याशा शैक्षणिक उपक्रमाचे बीज रोवून, अरुण पवार यांनी पुढील १३ वर्षांत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याची ठसा उमटवला. उभारलेल्या निधीमधून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्ने त्यांनी त्यांच्या छोट्याशा उपक्रमाने साकारली. ‘आरोग्य हेची धन’ या तत्त्वावर त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे गावागावांत नेली. पर्यावरणासाठी झाडांचे कोंदण उभे करताना त्यांनी कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि जनजागृतीच्या माध्यमातून अनेक हात या चळवळीत जोडले.गरजू माणसाच्या हाकेला धावून जाणारे पवारसाहेब त्यांच्या प्रत्येक समस्येवर मार्ग काढत — म्हणूनच त्यांनी पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण अशा उपक्रमांद्वारे समाजाला नवसंजीवनी दिली.
वृक्षप्रेमी असणारे अरुण पवार यांना त्यांच्या समाजसेवेच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी ‘समाजभूषण’, ‘धारूरत्न’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज वन श्री’ हा वन विभागाचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.पुरस्कारांनी गौरवलेले हे कार्य केवळ सन्मानापुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या कार्यामुळे असंख्य स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन समाजभानाने पुढे येत आहेत.
अरुण पवार यांच्यासाठी समाजसेवा ही नोकरी नाहीतर ती एक जबाबदारी आहे — आणि हीच जबाबदारी ते व्रतासारखी निभावत आहेत.
सुरुवातीचे जीवन
लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांच्या मनात होती. शिक्षणाच्या कळकळीपासून ते पर्यावरण रक्षणापर्यंत, २०१२ मध्ये त्यांनी पहिला उपक्रम हाती घेतला आणि पुढची अनेक वर्षे शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या वाटेवर स्वतःला झोकून दिले.
अरुण पवार हे एक समर्पित सामाजिक कार्यकर्ते असून २०१२ ते २०२५ या काळात त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन आणि समुदाय विकास अशा विविध उपक्रमांद्वारे आपल्या समाजावर खोलवर आणि सकारात्मक परिणाम केला आहे
सामाजिक कार्य
अरुण पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात शिक्षणाशी रोवली त्यांनी दुर्बल आणि वंचित मुलांसाठी शिष्यवृत्ती, विशेष शाळा आणि कौशल्यविकास उपक्रम सुरू केले.
आरोग्यसेवा म्हणजेच निरोगी समाज — हे ओळखून त्यांनी दुर्गम भागात मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीमा आणि जनजागृती उपक्रम राबवले. पर्यावरण हीच खरी शाश्वत संपत्ती मानून त्यांनी हजारो झाडे लावली, वृक्षसंवर्धन चळवळी चालवल्या आणि स्वच्छता व कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी केली.
News
Recent Events

































एक पाऊल समाजसेवेकडे – नागरिकांच्या सोयीसाठी
🌳वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विशेष उपक्रम ! मोफत स्मार्ट कार्ड सेवा - आता तुमच्या साठी !वाढदिवस विशेष म्हणून वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे : मतदान कार्ड , आयुष्यमान भारत कार्ड , आधार कार्ड यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात येणार आहे.योजनेचा शुभारंभ आज योगशिक्षक , एक्टरेस , चित्रपट , धुमस , दिल बेधुंद , फांजर , अनेक सिरीयल , माझी विठू माऊली , माझी रेणुका माऊली , क्राइम पेट्रोल , लय भारी कारभारी , शॉर्ट फिल्म धाडस अभिनेत्री साक्षी चौधरी, गुरुवर्य माऊली योगा टीचर खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या वेळी त्यांचा श्री ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा ग्रंथ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला, ही एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला जोडणारी भावना होती."यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.ही मोफत सेवा: 👉 आजपासून 13 ऑगस्ट 2025 पर्यंत 🕘 दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.आपले कागदपत्र घेऊन वेळेत या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या! 🙏 ही लोकहितार्थ योजना असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती! – वृक्षमित्र अरुण पवार


🌳 वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 🌳 एक सामाजिक उपक्रम... जनहितासाठी एक पाऊल पुढे!
वृक्ष लावा, जीवन जगवा, निसर्गाशी नाते जपा ॥ पवारांचे कार्य थोर, जनसेवा हेच जीवनाचं गौरव ॥ आधार-मतदानाचं काम, आरोग्य देखील लाभावं नाम । आयुष्यमान योजनेचा गंध, सर्वांस होवो आनंद ॥ 🌳 वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 🌳 एक सामाजिक उपक्रम... जनहितासाठी एक पाऊल पुढे! 📢 दिनांक – ११ ते १३ ऑगस्ट २०२५ 🕘 सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत 🏠 स्थळ – मराठवाडा जनविकास संघ, घरकुल, चिखली विभाग उपलब्ध सेवा: ✅ नवीन मतदान कार्ड ✅ नवीन आधार कार्ड व दुरुस्ती ✅ स्मार्ट आधार कार्ड ✅ आयुष्मान भारत कार्ड व स्मार्ट कार्ड योजना 🙏 आज या उपक्रमाचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ही योजना मित्र परिवार व मराठवाडा जनविकास संघ, घरकुल चिखली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या कागदपत्रांची योग्य ती नोंदणी करून घ्यावी.












🌳🌱वृक्षारोपण अभियान🌱🌳
शनिवार,दि :- २ ऑगस्ट २०२५ रोजी, सनफ्लॉवर पब्लिक स्कूल, मारूंजी येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) व सनफ्लॉवर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी वृक्षारोपण अभियान यशस्वीरित्या पार पडले.या अभियानामागील हेतू केवळ झाडे लावणे नव्हता, तर निसर्गाशी आपली नाळ जोडणे आणि भविष्यासाठी हिरवा विचार रुजवणे हा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात खास पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. सर्व मान्यवर, शिक्षक, अधिकारीवर्ग, विद्यार्थी व वृक्षमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन वृक्षपूजन केले व नंतर पवित्र अशा वृक्षपालखीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सृजनशील पद्धतीने सहभाग नोंदवून एक आदर्श उदाहरण घालून दिले. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, वृक्षमित्र, शिक्षकवर्ग, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. त्यांच्याविषयी मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. हे वृक्ष केवळ रोवले गेले नाहीत, तर एक नवा संकल्प रुजवला गेला हिरव्या महाराष्ट्राचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा !
Media
A Decade of Social Work (2012-2025)





2012




2013






2014




2015







