Events







🙏🏻"फुल न फुलाची पाकळी" म्हणत…मराठा बांधवांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे!🙏🏻
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा. अरुण पवार,मा. उद्योजक योगेश गोपाळे,मा. कॅप्टन युवराज माने,मा. प्रकाश इंगोले ,मा. रवी जाधव , मा. किशोर अटरगेकर,मा. वैभव जाधव, मा. सतीश काळे,मा. शिवाजी पाडुळे,मा. रावसाहेब गंगाधरे ,मा. लक्ष्मण जाधव,मा.सुग्रीव पाटील,मा. सहदेव मोरे,मा. नितीन कने व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड यांच्या पुढाकाराने संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान, मुंबई येथील अमरण उपोषणास पाठिंबा व साथ देण्यासाठी रविवार, दि :- 31-ऑगस्ट-२०२५, रोजी ५००० जेवणाचे पॅकेट , पाणी बॉटल व केळी कॅरेट मराठा बांधवांच्या सेवेसाठी देण्यात आले . कुणाला काही मदत करायची असेल, तर हीच ती वेळ – आपल्या समाजासाठी उभं राहूया!" तुमचं छोटंसं योगदानही एखाद्याचं जग बदलू शकतं. जय जिजाऊ ! जय शिवराय ! एक मराठा ! लाख मराठा



मराठा बांधवांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे!🙏🏻
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा. अरुण पवार,मा. उद्योजक योगेश गोपाळे,मा. कॅप्टन युवराज माने,मा. प्रकाश इंगोले ,मा. रवी जाधव , मा. किशोर अटरगेकर,मा. वैभव जाधव, मा. सतीश काळे,मा. शिवाजी पाडुळे,मा. रावसाहेब गंगाधरे ,मा. लक्ष्मण जाधव,मा.सुग्रीव पाटील,मा. सहदेव मोरे,मा. नितीन कने व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड यांच्या पुढाकाराने संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान, मुंबई येथील अमरण उपोषणास पाठिंबा व साथ देण्यासाठी रविवार, दि :- 31-ऑगस्ट-२०२५, रोजी ५००० जेवणाचे पॅकेट , पाणी बॉटल व केळी कॅरेट मराठा बांधवांच्या सेवेसाठी देण्यात आले . कुणाला काही मदत करायची असेल, तर हीच ती वेळ – आपल्या समाजासाठी उभं राहूया!" तुमचं छोटंसं योगदानही एखाद्याचं जग बदलू शकतं. जय जिजाऊ ! जय शिवराय ! एक मराठा ! लाख मराठा





एकमतचा ३४ वा वर्धापनदिन आणि स्नेहमेळावा व सन्मान सोहळा
📍 स्थळ: आर्यन फंक्शन हॉल , धाराशिव रविवार :- दि. २४ ऑगस्ट २०२५, रोजी एकमत या लोकनेते विकासरत्न मा. विलासरावजी देशमुख यांच्या संकल्पनेतून १९९१ साली सुरू झालेल्या दैनिकाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात मला "कृषिरत्न कृतज्ञता सन्मान" प्रदान करण्यात आला, ही बाब माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक समाधानाची आहे. हा सन्मान मा. प्रवीण स्वामी सर (आमदार, उमरगा-लोहरा विधानसभा) यांच्या शुभहस्ते मिळाला, याचा विशेष गौरव वाटतो. हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या कार्याला साथ देणाऱ्या सर्वांच्या योगदानाचा सन्मान आहे. 💐 एकमत परिवार, विशेषतः मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, मच्छिंद्र कदम (व्यवस्थापकीय संपादक) आणि संपूर्ण आयोजन समितीचे मन:पूर्वक आभार! तसेच माझ्या कार्यात पाठबळ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे, कुटुंबाचे आणि मित्रपरिवाराचेही मन:पूर्वक धन्यवाद. आपण दिलेल्या या सन्मानामुळे माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असून, त्या अजून अधिक प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन









🌳 स्वातंत्र्य दिन विशेष वृक्षारोपण कार्यक्रम 🌳
"देशाला सजवू हिरव्या शृंगाराने, झाडांच्या छायेत साजरं होई स्वातंत्र्य गान। मातीला प्रेमाने हात लावून, उगम होतो भविष्याचा नव्यान!" 🌱 दि. १५ ऑगस्ट २०२५ स्थळ – लुंबिनी बुद्ध विहार, औंध कॅम्प सांगवी, पुणे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना, निसर्ग संवर्धनाचा संकल्प करत लुंबिनी बुद्ध विहार व वृक्षमित्र श्री. अरुण पवार (श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय महाराष्ट्र शासन पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने ११० देशी झाडांची (पिंपळ, वड, कडुलिंब, करंज, आवळा, चिंच, जांभूळ इत्यादी) लागवड करण्यात आली.🌱 मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात झाली. पर्यावरणाचे रक्षण हेच खरे राष्ट्रसेवेचे कार्य आहे, या भावनेने अनेकांनी सहभाग घेतला. "झाडे लावा, झाडे जगवा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माननीय श्री.अरुणभाऊ पवार यांच्या हस्ते वृक्ष दानाचा कार्यक्रम
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ५ जून पर्यावरण दिनानिमित्त माननीय श्री.अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते वृक्षदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. वाढत्या वृक्षतोडीचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम हाती घेतले, यात त्यांनी अनेक प्रकारची झाडांची रोपे दान केली, आपल्या पृथ्वीचा ऱ्हास कमी व्हावा व पृथ्वीचा समतोल टिकून राहावा असे त्यांचे ध्येय आहे.

माणुसकीची वारी: वारकऱ्यांना अन्न व आसऱ्याची सोय
पावसाच्या सरी, थकवा आणि भक्तिभावाने भरलेला प्रवास... अशा वेळी जर कुणी आपुलकीने मदतीचा हात पुढे केला, तर ती खरी माणुसकी! या निमित्ताने पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी माननीय अरुण भाऊ पवार यांच्या कार्यालयात एक दिवस मुक्काम आणि जेवणाची सोय करण्यात आली. त्यांच्या या सामाजिक पुढाकारामुळे थकलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सेवेमुळे वारकऱ्यांनी नवचैतन्याने पुढची वाटचाल सुरू केली.


साहित्यरत्न, ठोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
आज,शुक्रवार ०१/०८/२०२५ रोजी, सांगवी पोलीस स्टेशन येथे ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने भारतीय संविधानाच्या प्रतीचे बोर्ड चे अनावरण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये संविधानाचे मूल्य, समतेची जाणीव व कायद्याचा आदर वाढवणे हे आहे. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडला. कार्यक्रमात उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांना भारतीय संविधानाची प्रत सप्रेम भेट देण्यात आली. तसेच पिंपळे गुरव येथील कार्यक्रमात उपस्थित राहून अण्णाभाऊंच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा दिला.अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे संघर्ष, साहित्य आणि समतेसाठीची प्रेरणा आहे. त्यांचे विचार आजही लाखो लोकांच्या मनात नवी चेतना निर्माण करतात.आज त्यांच्या विचारांचं स्मरण करताना, आपण ठरवूया जिथं अन्याय असेल, तिथं आवाज उठवायचा ! अण्णा भाऊंच्या विचारांनीच आपल्याला एक समतावादी, न्याय्य समाज घडवायचा आहे. "अण्णा भाऊंचं जीवन म्हणजे संघर्ष, साहित्य आणि समाजासाठीचं समर्पण!"

नेतृत्वाची प्रेरणादायी भेट
माननीय अरुण भाऊ पवार यांनी अलीकडेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध सामाजिक विषयांवर आणि लोकहितासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. शरद पवार साहेबांनी अरुण भाऊंच्या समाजकार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









🌸🙏 माऊलीच्या सुवर्ण चरणी अर्पण 🙏🌸
"माझे माऊली पंढरीनाथ | वाहिले तुझीच पायवाट" श्री संत ज्ञानेश्वर संस्थान, आळंदी देवाची येथे होणाऱ्या लोकवर्गणीतून माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर ११ किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा संस्थान कमिटीने संकल्प केला आहे या पवित्र कार्यासाठी, फुल नाही,तरी फुलाची पाकळी म्हणत, रविवार दि :- ०३/०८/२०२५ रोजी, पवार कुटुंब , देशभक्त कॅप्टन युवराज माने,व मोहतादेवी ट्रान्सपोर्ट शंकरभाऊ तांबे तर्फे एक छोटीशी देणगी ज्ञानराजांच्या चरणी अर्पण केली. "जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||" माऊलींच्या या अमृतवाणीप्रमाणे, या कार्यात सहभागी होता आलं, हीच खरी माझी भाग्यरेषा!ही सेवा माऊलीच्या पायरीस पडलेली एक वाट आहे, जिथे ज्ञान हे वांग्मय आणि भक्ती ही शक्ती आहे. माऊलींच्या कृपेनेच हा सौभाग्याचा क्षण अनुभवता आला. या सुवर्ण कलशारोहणाने सर्व भक्तांसाठी एक नवा प्रकाशमार्ग ठरावा, हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना! ज्ञानोबा माऊली तुकाराम! जय जय राम कृष्ण हरी! 🙏🏻












🌳🌱वृक्षारोपण अभियान🌱🌳
शनिवार,दि :- २ ऑगस्ट २०२५ रोजी, सनफ्लॉवर पब्लिक स्कूल, मारूंजी येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) व सनफ्लॉवर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी वृक्षारोपण अभियान यशस्वीरित्या पार पडले.या अभियानामागील हेतू केवळ झाडे लावणे नव्हता, तर निसर्गाशी आपली नाळ जोडणे आणि भविष्यासाठी हिरवा विचार रुजवणे हा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात खास पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. सर्व मान्यवर, शिक्षक, अधिकारीवर्ग, विद्यार्थी व वृक्षमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन वृक्षपूजन केले व नंतर पवित्र अशा वृक्षपालखीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सृजनशील पद्धतीने सहभाग नोंदवून एक आदर्श उदाहरण घालून दिले. कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, वृक्षमित्र, शिक्षकवर्ग, अधिकारी आणि विद्यार्थी यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. त्यांच्याविषयी मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. हे वृक्ष केवळ रोवले गेले नाहीत, तर एक नवा संकल्प रुजवला गेला हिरव्या महाराष्ट्राचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा !




एक पाऊल समाजसेवेकडे – नागरिकांच्या सोयीसाठी
🌳वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विशेष उपक्रम ! मोफत स्मार्ट कार्ड सेवा - आता तुमच्या साठी !वाढदिवस विशेष म्हणून वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे : मतदान कार्ड , आयुष्यमान भारत कार्ड , आधार कार्ड यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात येणार आहे.योजनेचा शुभारंभ आज योगशिक्षक , एक्टरेस , चित्रपट , धुमस , दिल बेधुंद , फांजर , अनेक सिरीयल , माझी विठू माऊली , माझी रेणुका माऊली , क्राइम पेट्रोल , लय भारी कारभारी , शॉर्ट फिल्म धाडस अभिनेत्री साक्षी चौधरी, गुरुवर्य माऊली योगा टीचर खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या वेळी त्यांचा श्री ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा ग्रंथ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला, ही एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला जोडणारी भावना होती."यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.ही मोफत सेवा: 👉 आजपासून 13 ऑगस्ट 2025 पर्यंत 🕘 दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.आपले कागदपत्र घेऊन वेळेत या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या! 🙏 ही लोकहितार्थ योजना असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती! – वृक्षमित्र अरुण पवार


🌳 वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 🌳 एक सामाजिक उपक्रम... जनहितासाठी एक पाऊल पुढे!
वृक्ष लावा, जीवन जगवा, निसर्गाशी नाते जपा ॥ पवारांचे कार्य थोर, जनसेवा हेच जीवनाचं गौरव ॥ आधार-मतदानाचं काम, आरोग्य देखील लाभावं नाम । आयुष्यमान योजनेचा गंध, सर्वांस होवो आनंद ॥ 🌳 वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 🌳 एक सामाजिक उपक्रम... जनहितासाठी एक पाऊल पुढे! 📢 दिनांक – ११ ते १३ ऑगस्ट २०२५ 🕘 सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत 🏠 स्थळ – मराठवाडा जनविकास संघ, घरकुल, चिखली विभाग उपलब्ध सेवा: ✅ नवीन मतदान कार्ड ✅ नवीन आधार कार्ड व दुरुस्ती ✅ स्मार्ट आधार कार्ड ✅ आयुष्मान भारत कार्ड व स्मार्ट कार्ड योजना 🙏 आज या उपक्रमाचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ही योजना मित्र परिवार व मराठवाडा जनविकास संघ, घरकुल चिखली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपल्या कागदपत्रांची योग्य ती नोंदणी करून घ्यावी.




जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माननीय श्री.अरुणभाऊ पवार यांच्या हस्ते वृक्ष दानाचा कार्यक्रम
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ५ जून पर्यावरण दिनानिमित्त माननीय श्री.अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते वृक्षदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला होता. वाढत्या वृक्षतोडीचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम हाती घेतले, यात त्यांनी अनेक प्रकारची झाडांची रोपे दान केली, आपल्या पृथ्वीचा ऱ्हास कमी व्हावा व पृथ्वीचा समतोल टिकून राहावा असे त्यांचे ध्येय आहे.


माणुसकीची वारी: वारकऱ्यांना अन्न व आसऱ्याची सोय
पावसाच्या सरी, थकवा आणि भक्तिभावाने भरलेला प्रवास... अशा वेळी जर कुणी आपुलकीने मदतीचा हात पुढे केला, तर ती खरी माणुसकी! या निमित्ताने पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी माननीय अरुण भाऊ पवार यांच्या कार्यालयात एक दिवस मुक्काम आणि जेवणाची सोय करण्यात आली. त्यांच्या या सामाजिक पुढाकारामुळे थकलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या सेवेमुळे वारकऱ्यांनी नवचैतन्याने पुढची वाटचाल सुरू केली. ही सेवा त्यांच्या माणुसकीच्या भावनेचं आणि सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहे. वारकऱ्यांनी त्यांच्या या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. दरवर्षीप्रमाणे यंदाही माननीय अरुण भाऊ पवार यांनी ही सेवा परंपरा जपली आणि पार पाडली आहे.






१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माननीय अरुण पवार यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे वाटप
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत माननीय श्री. अरुणभाऊ पवार यांनी संविधानाचे वाटप केले. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलीत, गरीब यांच्या उन्नती साठी खर्च केले, अश्या या महामानवाला वंदन करत, आपल्या तरुण पिढीला प्रोत्साहन देऊन भारताला पुढे घेऊन जाण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न.






मंदिरात भक्ती, परिसरात स्वच्छता – अरुण भाऊंचा स्तुत्य उपक्रम
माणनीय अरुण भाऊ पवार यांच्या पुढाकाराने तुळजाभवानी मंदिर परिसरातील स्वच्छता तसेच टॅंकर आणून झाडांना पाणी देण्याचे कार्य यशस्वीरित्या पार पडले. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ व शांत वातावरण तयार करून त्यांनी समाजसेवेचे अनोखे उदाहरण घडवले.या उपक्रमामुळे परिसर अधिक स्वच्छ, हिरवळीत न्हालेला व भक्तांसाठी सुखद अनुभव देणारा बनला. या उपक्रमामुळे केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर पर्यावरण जपण्याचा संदेशही दिला गेला. स्वच्छता आणि हरिततेचा संगम साधत त्यांनी लोकांमध्ये सकारात्मकता पेरली. स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी या कार्याचे मनापासून स्वागत केले




नेतृत्वाची प्रेरणादायी भेट
माननीय अरुण भाऊ पवार यांनी अलीकडेच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध सामाजिक विषयांवर आणि लोकहितासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. शरद पवार साहेबांनी अरुण भाऊंच्या समाजकार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. ही भेट केवळ औपचारिक न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी ठरली तसेच स्थानिक पातळीवरील विकास आणि जनसेवा यावर दोघांनी आपले विचार मांडले



झाडे लावा, झाडे जगवा — देणगीचा सकारात्मक उपयोग
पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय, शिरसाळा इथे वृक्ष लागवडीसाठी माननीय श्री.अरुणभाऊ पवार यांच्याकडून ₹११,०००/- ची देणगी देण्यात आली. या देणगीमुळे महाविद्यालयाच्या परिसरात नव्या झाडांची लागवड झाली. त्यामुळे परिसर हिरवा-गार राहील आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. या कार्यक्रमामधे त्यांच्या कार्यकर्त्यांनी विषेश हजेरी लावून विद्यार्थ्यांमध्येही वृक्षप्रेमाची भावना निर्माण केली.





संत गाडगे बाबा जयंती — स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा संदेश
संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संचालक व अध्यक्ष माननीय श्री.अरुणभाऊ पवार व संत गाडगे बाबा जेष्ठ नागरिक संघ आणि सर्व झाडू कामगार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संत गाडगे बाबांनी समाजात स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सर्वांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला.







भक्ती आणि सेवा यांचा संगम: अरुण पवार यांची देणगी
भंडारा डोंगर येथे उभारण्यात येत असलेल्या तुकाराम महाराज मंदिरासाठी अरुण भाऊ पवार यांनी समाजसेवेच्या भावनेतून पाण्याचा टँकर दिला. मंदिराच्या बांधकामासाठी पाण्याची मोठी गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या मदतीमुळे कामाला गती मिळाली. ग्रामस्थांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. अशी सेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल











दत्त जयंतीनिमित्त मा. अरुण भाऊ पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फळे वाटप
दत्त जयंतीच्या पवित्र निमित्ताने मा. अरुण भाऊ पवार यांच्या वतीने वारकऱ्यांना फळे वाटप करण्यात आली. श्रद्धा आणि सेवाभाव जपत हा उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. लांबून आलेल्या वारकऱ्यांना हा उपक्रम उपयुक्त ठरला. फळांमुळे भक्तांना थोडा विरंगुळा आणि ताजेतवानेपणा मिळाला. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. अशी सेवा समाजात सकारात्मकता आणि भक्तीचा संदेश पोहोचवते.













मराठवाडा जनविकास संघाच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
मराठवाडा जनविकास संघाचा (महाराष्ट्र) घरकुल विभाग, चिखली या ठिकाणी १३व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ह. भ. प. बब्रुवान वाघ महाराज यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते वाघ महाराज यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम, भाषणे आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले. उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले.





पिंपळे गुरव येथे वृक्षसंवर्धनासाठी समाजसेवेचा उपक्रम
मा. अरुण भाऊ पवार यांच्या वतीने समाजसेवेच्या उद्देशाने पिंपळे गुरव येथील ६० फुटी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लावलेली झाडे टिकून राहावीत व त्यांचे योग्य संगोपन व्हावे, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी अशा कृतींचे विशेष महत्त्व आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. ही समाजसेवा पर्यावरणप्रेमी दृष्टिकोन दर्शवणारी ठरली.
















ज्ञानाचा दीप उजळवणारा उपक्रम – शालेय साहित्य वाटप
मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अरुण भाऊ पवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही एक सकारात्मक मदत ठरली. हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता, शिक्षणास प्रोत्साहन देणारा ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला. स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाची जाणीव आणि सेवा भाव वाढीस लागेल.



वृक्ष लागवडीचा संदेश: १०० झाडे शाळेला भेट
मा. अरुण पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेला वृक्ष लागवडीसाठी १०० झाडे भेट दिली गेली. या उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची महत्वाची शिकवण मिळाली. मा. अरुण पवार यांचे हे कार्य निसर्गाची काळजी घेण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरले. विद्यार्थ्यांनी या झाडांची लागवड केली, ज्यामुळे शाळेचा परिसर हिरवागार होईल आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल. मा. अरुण पवार यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. अशा उपक्रमांचा समाजातील प्रत्येकाला मोठा फायदा होतो, आणि भविष्यात या झाडांची वाढ प्रकर्षाने दिसून येईल.







स्वातंत्र्य दिनावर झाडांच्या माध्यमातून पर्यावरणाची सेवा
स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी वाकडमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला गेला. या दिवशी, स्थानिक नागरिक आणि समाजसेवी मा. अरुण भाऊ पवार यांच्या नेतृत्वात, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वाकड परिसरात झाडे लावण्यात आली. यामुळे निसर्गाच्या प्रति जागरूकता वाढवण्यास मदत झाली. या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आणि भविष्यात याचा फायदा सर्वांनाच होईल. मा. अरुण भाऊ पवार यांच्या या कार्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा प्रचार झाला . अशा उपक्रमांमुळे समाजाच्या सर्वांगीण विकासात योगदान मिळते, तसेच तरुण पिढीला पर्यावरणाची काळजी घेण्याचे महत्व शिकवले जाते.






मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी-चिंचवड तर्फे ७६वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा नेतृत्व: मा. श्री. अरुण पवार
दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने ७६वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांना अभिवादनाने व दीपप्रज्वलनाने झाली. मा. श्री. अरुण पवार यांनी आपल्या भाषणात हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. त्यांनी शूर हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण करून दिली व आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, तसेच समाजउपयोगी उपक्रम जसे की रक्तदान शिबिर व वृक्षारोपण हेदेखील पार पडले. उपस्थित मान्यवरांनी श्री. पवार यांच्या सामाजिक कार्याचे आणि त्यांच्या नेतृत्वातील संघटनेच्या योगदानाचे कौतुक केले. हा कार्यक्रम नव्या पिढीला आपल्या इतिहासाशी जोडणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला.



पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिला सन्मान आणि आभार
मा. अरुण भाऊ पवार यांच्या पुढाकाराने पोस्ट ऑफिस येथील कर्मचाऱ्यांना मिठाई आणि कपडे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामध्ये त्यांच्या कठोर परिश्रमांची कदर केली गेली आणि त्यांना योग्य आदर दिला गेला. मा. अरुण भाऊ पवार यांच्या या कार्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्या कामाचे महत्त्वाचे मूल्य लक्षात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकतेची भावना वाढते आणि त्यांचे प्रोत्साहन वाढवले जाते.






दिवाळीच्या सणानिमित्त दिलेले प्रेम
दिवाळीच्या पावन पर्वावर मा. अरुण भाऊ पवार यांच्याकडून एक अत्यंत मोलाचा उपहार देण्यात आला. त्यांनी झाडू कामगार व ससून हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांना मिठाई आणि कपडे देऊन त्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी केले. यामुळे त्या कामकाजी लोकांना दिवाळीच्या निमित्ताने एक सन्मान मिळाला आणि त्यांच्या कठोर परिश्रमांची किमत सर्वांना कळली. मा. अरुण भाऊ पवार यांचे हे कार्य एक प्रेरणादायक उदाहरण ठरले.समाजाच्या दुर्बल घटकांसाठी दिवाळीच्या सणानिमित्त आपले प्रेम आणि दयाळू वृत्ती व्यक्त केली गेली. अशा प्रकारच्या दानशुरतेमुळे दिवाळीची खरी भावना जागृत होते आणि समाजाची एकजूट आणखी दृढ होते.






वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे वाटप - मा. अरुण भाऊ पवार यांचा उपक्रम
मा. अरुण भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवला गेला. या उपक्रमात, त्यांनी स्थानिक नागरिकांना झाडे वाटली, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जाणीव वाढली. मा. अरुण भाऊ पवार यांच्या या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आणि झाडांचे महत्व सांगितले. यामध्ये विविध प्रकारची झाडे वाटली गेली, ज्यामुळे परिसर हिरवागार होईल आणि पर्यावरणाची सुधारणा होईल. मा. अरुण भाऊ पवार यांच्या या कार्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे महत्व नागरिकांना समजले आणि त्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. असे सामाजिक उपक्रम वाढवण्याचे कार्य भविष्यामध्येही चालू राहील.




भंडारा डोंगर येथे मा. श्री अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते तुकोबारायांच्या चरणी आंब्याचा महान्नैवेद्य
भंडारा डोंगर या पवित्र स्थळी मा. श्री अरुण भाऊ पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी आंब्याचा महान्नैवेद्य अर्पण करण्यात आला. भक्तिभावाने परिपूर्ण या सोहळ्याला अनेक वारकरी व भक्तमंडळींनी उपस्थिती लावली. या प्रसंगी तुकोबारायांच्या चरणी प्रेम, श्रद्धा व सेवाभावाने नैवेद्य अर्पण करत संप्रदायातील निष्ठा व्यक्त करण्यात आली. डोंगरावर गजर, अभंग आणि हरिपाठाचा स्वर दुमदुमला होता. अरुण पवार यांचे हे कार्य वारकरी परंपरेच्या सेवाभावाचे सुंदर उदाहरण ठरले. भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा भाविकांच्या मनात कायमचा कोरला गेला.


अरुणभाऊ पवार यांना देहूमध्ये वारकरी पुरस्काराने सन्मानित
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात झालेल्या विशेष कार्यक्रमात अरुणभाऊ पवार यांना "वारकरी पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाची पावती असून, त्यांनी अनेक वर्षे समाजप्रबोधन व कीर्तन सेवा केली आहे. कार्यक्रमात विविध वारकरी संतांची व भक्तांची उपस्थिती होती. संत तुकाराम महाराजांच्या पावन स्थळी मिळालेला हा पुरस्कार अरुणभाऊंसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. त्यांच्या कार्याची ही पावती अनेकांना प्रेरणा देणारी आहे. वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांचे कार्य आजही समाजमनात आदराने गाजत आहे.




हरित क्रांतीचे योध्दे – अरुण पवार यांना केंद्रीय सन्मान
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षमित्र अरुण पवार यांना त्यांच्या पर्यावरण रक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अरुण पवार यांनी अनेक वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी सातत्याने मेहनत घेतली आहे. त्यांच्या हरित समर्पणाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी अरुण पवार यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. हा सन्मान त्यांच्या सामाजिक भानाच्या कार्याला योग्य अशी मान्यता ठरली. पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरला.